Unesco's:1st world heritage site of india...Ajinta caves
अजिंठा लेणी अजिंठा लेणी बौद्ध भिक्खूंनी वाकाटक राजांच्या आश्रयाखाली उत्खनन केली होती, ज्यापैकी हरिसेना हा प्रमुख होता. 1983 पासून अजिंठा लेणी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. भारत आणि महाराष्ट्राचे 1 ले जागतिक वारसा स्थळ आहे. आणि ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक आहेत. अजिंठा लेणी 75-मीटर (246-फूट) दगडी भिंतीमध्ये कोरलेल्या प्राचीन बौद्ध मठांचा आणि प्रार्थना खोल्यांचा संग्रह आहे. अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसर...