पोस्ट्स

tallest statue लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Statue Of Unity world's No 1 Tallest Statue(एकतेचा पुतळा)

इमेज
  स्टॅच्यू ऑफ युनिटी ( Sadhu Bet, Sardar Sarovar Dam) (वल्लभभाई पटेल  एकतेचा पुतळा   १८२ मीटर (५९७ फूट)) ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता.  स्टॅच्यू ऑफ युनिटी  ( एकतेचा पुतळा ) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते  वल्लभभाई पटेल  यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारतातील  गुजरात   राज्याच्या  राजपिपळा   शहराजवळ  नर्मदा धरणाजवळील   साधू बेटावर उभारलेला आहे.  स्मारक २०,००० मी २  क्षेत्रात आहे आणि १२ किमी २  आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४   पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८  मध्ये पूर्ण झाले. भारतीय मूर्तिकार  राम व्ही. सुतार  यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती.  जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले