Unesco's:1st world heritage site of india...Ajinta caves

 

अजिंठा लेणी

  • अजिंठा लेणी बौद्ध भिक्खूंनी वाकाटक राजांच्या आश्रयाखाली उत्खनन केली होती, ज्यापैकी हरिसेना हा प्रमुख होता.
  • 1983 पासून अजिंठा लेणी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
  • भारत आणि महाराष्ट्राचे 1 ले जागतिक वारसा स्थळ आहे.
  •  आणि ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक आहेत.
  •  अजिंठा लेणी 75-मीटर (246-फूट) दगडी भिंतीमध्ये कोरलेल्या प्राचीन बौद्ध मठांचा आणि प्रार्थना खोल्यांचा संग्रह आहे.
  • अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. 
  • ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत.









  • प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. 
  • त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. 
  • अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते.
  • अजिंठा येथे एकूण २९ लेण्यांपैकी हीनयान कालखंडातील लेण्यांमधली ९व्या व १०व्या क्रमांकाची लेणी ही चैत्यगृहे आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे हे विहार आहे. 
  • महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकांची लेणी विहार आहेत.
  • या लेण्यांचे क्रमांक त्यांच्या निर्मितीकालानुक्रमे दिलेले नसून एकापाठोपाठ एक येणाऱ्या लेण्यांनुसार दिले आहे
  • अजिंठ्यातील चित्रे ही प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथांचे चित्रण करतात.
  •  बुद्धाच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत. या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात.
  •  बुद्धाचे आयुष्य, त्याचे विविध अवतार, त्याचे पुढील जन्म असे सर्व वर्णन या जातक कथांमध्ये दिसून येते. 
  • भिंतींवरील जातकांची चित्रे ही बोधप्रद आहेत.
  • दहाव्या आणि अकराव्या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी विलक्षण आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Veera Abhaya Anjaneya Hanuman Swami Statue

UNESCO :India's 41st World Heritage Site Shantiniketan...

Statue Of Oneness:Shivraj Chouhan Inaugurates Adi Shankaracharya Statue on 21 Sep 2023