पोस्ट्स

India's 42nd UNESCO's World Heritage site... होयसळ मंदिर

इमेज
  होयसळ मंदिर कर्नाटकच्या होयसळ येथील बेलूर , हलेबिड आणि सोमनाथपुरा या मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था ( UNESCO )ने सोमवारी याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियातील रियाध येथे जागतिक वारसा समितीच्या ४५व्या सत्रादरम्यान हा निर्णय घेण्यात आला. कला आणि साहित्याचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या होयसळ राजवंशाची ही राजधानी होती. ही मंदिरे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारके आहेत. हळेबीडु  किंवा  हळेबीड  हे कर्नाटक राज्यातील हासन जिल्ह्यातल्या बेलूर तालुक्यातील एक गाव आहे   शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली श्री होयसाळेश्वर आणि श्री केदारेश्वर मंदिरे आहेत. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनानी मलिक काफुर याने हे गाव दोन वेळा उध्वस्त केले, म्हणून याला तुटलेले-फुटलेले गाव म्हणजेच कन्नड भाषेत हळेबीडु असे म्हटले जाते. होयसाळ हे देवगीरीच्या यादव वंशातील होते.  हळेबीडु ही इ.स. १२ व १३ व्या शतकात होयसाळ साम्राज्याची राजधानी होती.  येथे श्री होयसाळेश्वर, श्री केदारेश्वर, श्री शांत...

UNESCO :India's 41st World Heritage Site Shantiniketan...

इमेज
  शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारतीची स्थापना केली, त्या शांतिनिकेतन स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सुप्रसिद्ध पुरातत्व वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांनी यासाठी दस्तावेज तयार केले होते.  काही महिन्यांपूर्वी या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आयकोमॉसने शांतिनिकेतनविषयी युनेस्कोला शिफारस केली होती. रवींद्रनाथ टागोर यांचे पिता  महर्षी देवेंद्रनाथ टागोर  यांनी तेथे सर्वप्रथम  शांतिनिकेतन आश्रमाची स्थापना केली होती भारताच्या पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्या चा एक परिसर आहे. याची स्थापना महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी 1863 मध्ये केली होती आणि नंतर त्यांचा मुलगा रवींद्रनाथ टागोर यांनी विस्तार केला. रवींद्रनाथांनी याचे रुंपातरण करून त्याचे विश्वभारती विद्यापीठ तयार केले. 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये स्थापन केलेल्या, विश्व भारतीला 1951 मध्ये...

Social worker of india:Mahatma Jyotibrao Phule

इमेज
  ज्योतिराव गोविंदराव फुले    (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०)   ज्योतिबा फुले कोण होते?   जोतीराव फुले यांचे मूळ गाव  सातारा   जिल्ह्यातील  कटगुण   हे होते.  त्या ठिकाणी  जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.  शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.   जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.  जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी  सावित्रीबाई फुले  यांच्याशी झाला.  प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी  भाजी  विक्रीचा व्यवसाय केला.  इ.स. १८४२  मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल  मध्ये त्यांनी प्रवेश घेतला.  बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद...