स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस
शुक्रवार, 19 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आले असून, या पुतळ्याचा जगातील सर्वात उंच 50 पुतळ्यांच्या यादीत समावेश केला जाईल. त्याची उंची जमिनीपासून 206 फूट आहे. यापूर्वी तेलंगणामध्ये असलेला आंबेडकरांचा 175 फूट उंच पुतळा सर्वात उंच मानला जात होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी लिहिले, विजयवाडा येथे आमच्या सरकारने उभारलेले आंबेडकरांचे 206 फुटांचे महाशिल्प हे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचेही प्रतिक आहे. 125 फूट उंच आहे आणि 81 फूट उंच चौथऱ्यावर आहे. 404.35 कोटी रुपये खर्च आला होता. हा एका हिरव्यागार उद्यानात 18.81 एकरच्या कॅम्पसमध्ये वसलेला आहे. कच्चा माल मिळवण्यापासून ते डिझाइनिंगपर्यंत, पुतळ्याचे बांधकाम पूर्णपणे 'मेड इन इंडिया' प्रकल्पांतर्गत केले गेले. यासाठी सुमारे 400 टन स्टील वापरले गेले. पुतळ्याच्या जागी स्वराज मैदानासह पुतळ्याच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात आला. कॅम्पसमधील...